Breaking News
Home / माहिती / ISRO ने विक्रम लँडर शोधला, ऑर्बिटरने थर्मल कॅमेराने फोटो मिळवला

ISRO ने विक्रम लँडर शोधला, ऑर्बिटरने थर्मल कॅमेराने फोटो मिळवला

इस्रोचे मिशन चंद्रयान-२ भलेही इतिहास बनु शकला नाही परंतु वैज्ञानिकांना देश सलाम करत आहे. इस्रो (ISRO) चे वैज्ञानिक मागील अनेक वर्षांपासून दिवसरात्र एक करून ह्या मिशनला यशस्वी बनवण्यासाठी काम करत होते. जे डोळे मोठ्या उत्सुकतेने स्क्रीनवर मिशन चंद्रयान-२ च्या प्रत्येक पावलावर नजर खिळून होती, परंतु विक्रम लँड अचानक लँडिंगच्या जवळ असताना लॅण्डरचा इस्रोशी संपर्क तुटला. परंतु इस्रो (ISRO) ला आता चंद्रावर विक्रम लॅण्डरची स्थिती माहिती झाली आहे. ऑर्बिटरने थर्मल कॅमेरामधून त्याचे फोटो घेतले आहे. असं असलं तरी त्यामुळे अजून लँडरशी संपर्क होऊ शकला नाही आहे. परंतु इस्रो लवकरच लॅण्डर सोबत संपर्क साधू शकेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. हि सुद्धा बातमी आहे कि विक्रम लॅण्डर निश्चित केलेल्या लँडिंग वाल्या जागेपेक्षा ५०० मीटर दूर पडलं आहे.

चंद्रयान-२ च्या ऑर्बिटरमध्ये असलेल्या ऑप्टिकल हाय रिजोल्यूशन (OHRC) ने विक्रम लॅण्डरचे फोटो घेतले आहेत. आता इस्रो वैज्ञानिक ऑर्बिटरच्या साहाय्याने विक्रम लॅण्डरला संदेश पाठवण्याच्या प्रयत्न करत आहे ज्याच्या मदतीने त्याची कम्युनिकेशन सिस्टीम चालू होऊ शकेल. इस्रोच्या विश्वासू सूत्रांनी सांगितले कि बंगलोरस्थीत इस्रो सेंटर वरून सतत विक्रम लॅण्डर आणि ऑर्बिटरला संदेश पाठवला जात आहे. ज्यामुळे संपर्क जोडला जाऊ शकेल. इस्रोचे प्रमुख सिवन ह्यांनी सांगितले कि आम्हांला विक्रम लॅण्डर बद्दल माहिती मिळाली आहे. ते चंद्राच्या पृष्ठभावर दिसून आले आहे. ऑर्बिटरने लॅण्डरचा एक थर्मल फोटो घेतला आहे. परंतु आतापर्यंत लँडरसोबत कोणताही संपर्क होऊ शकला नाही आहे. आम्ही संपर्क करण्याचा प्रयन्त करत आहोत. भविष्यात लॅण्डर आणि प्रज्ञान रोव्हर किती काम करतील, ह्याचे माहिती डेटा अनालिसिस झाल्यानंतरच कळू शकेल.

इस्रो वैज्ञानिक आता हे माहित करून घेत आहे कि चंद्राच्या पृष्ठभागाच्या २.१ किमी उंचीवर विक्रम लॅण्डर आपल्या निश्चित केलेल्या मार्गावरून का दूर गेले. ह्याचे एक कारण हे होऊ शकते कि विक्रम लॅण्डरच्या बाजूला असलेल्या ४ छोट्या छोट्या स्टीयरिंग इंजिनांपैकी कोणत्या एका इंजिनचे काम बंद पडले असेल. ह्या कारणामुळे विक्रम लॅण्डर आपल्या निश्चित केलेल्या मार्गावरून दूर गेले. इथूनच सर्व समस्येला सुरुवात झाली. ह्यामुळे वैज्ञानिक ह्या पॉईंटचा अभ्यास करत आहेत. ह्याशिवाय चंद्रावर चारही दिशेने फिरणारे ऑर्बिटरमध्ये लावलेल्या ऑप्टिकल हाय रिसोल्युशन कॅमेरा (OHRC) मधून विक्रम लॅण्डरचे फोटो घेतले जाणार. हा कॅमेरा चंद्राच्या पृष्ठभागावर ०.३ मीटर म्हणजेच १.०८ फुटाच्या उंचीपर्यंत कोणत्याही गोष्टीबद्दल स्पष्ट फोटो घेऊ शकतो.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.