अमेरिकाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ह्यांची मुलगी इवांका ट्रम्प सुद्धा त्यांच्यासोबत भारताच्या दौऱ्यावर आली होती आणि आपल्या ह्या दौऱ्यादरम्यान इवांका ट्रम्पच्या सुद्धा खूप चर्चा झाल्या. इवांका ट्रम्प आपल्या पतीसोबत ताजमहालला सुद्धा गेली होती आणि ताजमहालात इवांकाने खूप वेळ घालवला होता. इवांकाचे सर्व फोटोज सोशिअल मीडियावर वायरल होत आहे आणि प्रत्येक जण तिच्या सौंदर्याची प्रसंशा करत आहेत. इवांका ट्रम्प कोण आहे आणि काय करते ? लोकांच्या मनात हे प्रश्न सतावत आहेत. तर चला आज आम्ही इवांकाबद्दल संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. ३८ वर्षीय इवांका ट्रम्प विवाहित असून तिचा जन्म १९८१ मध्ये न्यूयॉर्क मध्ये झाला होता. इवांका हि डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पहिली पत्नी इवाना ह्यांची मुलगी आहे. खरंतर इवांका ट्रम्पचे नाव तिच्या आईच्या नावावर ठेवले गेले आहे.
इवांका ट्रम्प एक टॉपची मॉडेल होती आणि तिने आपल्या शाळेच्या दिवसात खूप मॉडेलिंग केले होते. ह्याशिवाय ती टेलिव्हिजन शो मध्ये सुद्धा दिसून आलेली आहे. इवांका ट्रम्प आज एक बिजनेस वुमन आहे आणि लेखिका म्हणून ओळखली जाते. इवांका ट्रम्पचे एक लाइफस्टाइल ब्रँड आहे. ज्याचे नाव ‘दि अप्रेन्टिस’ आहे आणि ती ह्या कंपनीची सीईओ आहे. ह्या ब्रँडअंतर्गत कपडे, चपला, शूज आणि दागिने बनवले जातात. खरंतर, अमेरिकेचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या मुलीचे स्वप्न एक अंतराळवीर बनण्याचे होते. इवांकाला भारत देश खूप आवडतो आणि साल २०१९ मध्ये सुद्धा इवांका भारत दौऱ्यावर आली होती. ह्या दौऱ्यादरम्यान तिने जयपूरमध्ये एका लग्नात सहभाग घेतला होता. सोबतच तिने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याशी भेट घेतली होती. इवांका ट्रम्पच्या पतीचे नाव जॅरेड कुशनर आहे, जो यहुदी धर्मीय आहे. जॅरेड कुशनर सोबत विवाह करण्याअगोदर इवांकाने जॅरेडसोबत दोन वर्षे डेटिंग केली होती. साल २००९ मध्ये इवांका ट्रम्पने धर्म बदलले होते आणि यहुदी धर्म स्वीकारला होता. दोघांनी नॅशनल गोल्फ क्लब मध्ये लग्न केले होते.
जॅरेड कुशनर एक व्यावसायिक आहे आणि त्याच्याजवळ ९१० कोटींच्या आसपास संपत्ती आहे. इवांका ३ मुलांची आई आहे. त्यांनी २०११ मध्ये आपला पहिला मुलगा अरबेला रोज कुशनर ह्याला जन्म दिला होता. त्यानंतर २०१३ मध्ये दुसरा मुलगा जोसेफ फेड्रिक कुशनर ह्याचा जन्म झाला. त्यानंतर २०१६ साली तिसरा मुलगा थिओडोर जेम्स कुशनर ह्याचा जन्म झाला होता. आताच इवांका ट्रम्प पुन्हा भारत दौऱ्यावर आली होती. ह्यावेळी इवांका आपले वडील डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्यासोबत भारतात आली होती. आपल्या ह्या दर्यादरम्यान इवांका साबरमती आश्रम, ताजमहाल आणि राष्ट्रपती भवनात गेली होती. इवांका ट्रम्प सोबत तिचा पती सुद्धा उपस्थित होता. ह्या दरम्यान इवांकाने भारतातील राजकीय नेत्यांसोबत सुद्धा भेट घेतली होती. इवांका अनेकदा डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्यासोबत दिसून येत असते आणि तिला राजनीती मध्ये खूप रस सुद्धा आहे. ती डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या राजनैतिक निर्णयात मदत करत असते.