Breaking News
Home / मराठी तडका / पती आहे लोकप्रिय दिग्दर्शक, अशी आहे खऱ्या जीवनात अरुंधती

पती आहे लोकप्रिय दिग्दर्शक, अशी आहे खऱ्या जीवनात अरुंधती

हरहुन्नरी ह्या शब्दाला समानार्थी असे काही कलाकार असतात. त्यांना एकच नव्हे तर अनेक कलाशाखांमध्ये गती असते. ते सतत विविध कलाक्षेत्रांमध्ये प्रयोग करत राहतात. स्वतःला कलाकार म्हणून सर्व बाजूंनी आकार देत असतात. अर्थात असे कलाकार हे संख्येने कमीही असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे, मधुराणी गोखले प्रभुलकर. सध्या चालू असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या अभिनेत्री. आज त्यांच्याविषयीच थोडसं. अभिनयाची उपजत आवड असलेल्या मधुराणी याचं बालपण कलेचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गेलं. शालेय शिक्षण आणि महाविद्यालय शिक्षण करता करता मधुराणी यांनी कलाक्षेत्रात मुशाफिरी करण्यास सुरुवात केली होती.

 

पुण्यातील मानाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्शेमध्ये त्यांनी स्वतःची एकांकिका बसवली होती. तिला पारितोषिकही मिळालं. पुढे त्यांनी आपलं अभिनयाची कारकीर्द सुरू ठेवली. ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात त्यांनी साकारलेली गोंधळलेली न्यूज अँकर आपण विसरूच शकत नाही. सुंदर माझं घर, गोडगुपित, मणीमंगळसूत्र या मराठी सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका सुद्धा लक्षात राहव्या अशाच. त्यांनी सिनेमासोबतच सिरियल्स मधेही काम केले आहे. किंबहुना त्यांच्या मालिकांमधल्या कामाची सुरुवात झाली ती ‘इंद्रधनुष्य’ या मालिकेमधून ती आजतागायत. ‘असंभव’ या लोकप्रिय मालिकेचाही त्या भाग होत्या. आधी म्हंटल्याप्रमाणे मधुराणी या हरहुन्नरी कलाकार आहेत. मालिकांमध्ये काम करता करता त्यांनी नाटकाशीही संबंध कायम ठेवले. त्यांनी २०१७ मध्ये ‘भूमिका’ नावाचं नाटक केलं होतं. काजव्यांचं गाव हे प्रायोगिक नाटकही केले. यातून त्यांची रंगमंचाविषयीची ओढ दिसून येते.

 

त्यांचा वाचन व्यासंग मोठा आहेच. त्या कवितांचे कार्यक्रम ‘कवितेचं पान’ या उपक्रमांतर्गत करत. ज्याची संकल्पना आणि दिग्दर्शन मधुराणी याचं होतं. त्यांच्या या कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील, सौमित्र, कौशल इनामदार या दिग्गजांनी सहभाग घेतला होता. नुकताच कवितांचा एक ऑनलाइन कार्यक्रम त्यांनी लोकप्रिय कवी संदीप खरे यांच्यासोबतहि केला. त्याचं लग्न प्रमोद प्रभुलकर यांच्याशी झालं आहे. प्रमोद हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. गेल्या वर्षी त्यांचा ‘युथट्युब’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. प्रमोद आणि मधुराणी गेली कित्येक वर्ष मिरॅकल्स अकॅडमी चालवतात, ज्या अंतर्गत उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन देतात. अशा या दाम्पत्याला एक छोटी मुलगीसुद्धा आहे. अभिनय असो व दिग्दर्शन. कविता वाचन असो व नाटक. सिनेमा असो व मालिका. प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा वेगळा असा ठसा मधुराणी यांनी उमटवला आहे.

त्यांच्या आई कुठे काय करते मधल्या आईची मध्यवर्ती भूमिकेला त्यांनी अगदी पुरेपूर न्याय दिला आहे. सगळं काही करूनही फार कमी श्रेय मिळणाऱ्या आईची व्यथा त्यांच्याइतकी समर्थ अभिनेत्रीच उत्तमरीतीने मांडू शकते. येत्या काळातही मधुराणी यांच्या कडून उत्तमोत्तम कलाकृती जन्माला येतील यात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठीगप्पा कडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.