Breaking News
Home / ठळक बातम्या / अशी स्टंटबाजी तुम्ही करु नका, मालेगावतील पुराच्या पाण्यात उडी मारणे तरुणाला जीवावर बेतलं

अशी स्टंटबाजी तुम्ही करु नका, मालेगावतील पुराच्या पाण्यात उडी मारणे तरुणाला जीवावर बेतलं

‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण आजवर आपण ऐकली असेलच. पण जो स्वतःला ही तारू शकत नाही, त्याला देव पण तारीत नाही. देव तारतो त्यालाच, ज्याच्या ठायी आत्मविश्वास असतो, अतिआत्मविश्वास नाही. ज्याच्या ठायी धाडस असते, आततायी पणा नाही. कारण माणसाचे अतिधाडस त्याच्या सर्व गुणांना भारी ठरते. म्हणजेच काय तर एखाद्या माणसाकडे सर्व चांगले गुण आहेत पण अतिधाडस किंवा अति आत्मविश्वास माणसाचा कधी घा’त करीन, ते सांगता येत नाही.

पाऊस म्हटलं की, 2 गोष्टींमध्ये मोठया प्रमाणात वाढ होते. पहिलं म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतं आणि दुसरं म्हणजे पर्यटनस्थळी गर्दी वाढते आणि निष्कळजीपणामुळे अपघा’त पण होतात. पावसाळ्यात अपघा’त होण्याचे प्रमाण इतर ऋतूंच्या तुलनेने जात असते. कारण रस्ते निसरडे झालेले असतात. पावसाळ्यात पर्यटनस्थळीही मोठ्या प्रमाणात अपघा’त होतात. अगदी काहींना यात मृ’त्यूलाही सामोरं जावं लागतं. पण या सगळ्यात महत्वाचे कारण असते ते म्हणजे अति धाडस करणे आणि नको तिथे स्टंटबाजी करणे.

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवस रात्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले, ओढ्यांना पूर आला असून काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसाच्या संततधारमुळे नदी नाल्याना पूर आला असल्याने, पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे. अश्यातच काही अतिउत्साही युवक या पुराच्या पाण्यात पोहण्याकरिता उडी घेताना दिसत आहे.

खरं तर लोकांसमोर शायनिंग मारायची, आपण किती पट्टीचे पोहणारे आहोत, हे दाखवून द्यायचे आणि चक्क आपल्याला जीवाला धोका असणारे धाडस पत्करनारे लोक थेट पाण्यात उडी घेतात. यापूर्वी अशीच शायनिंग मारायच्या नादात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी वर्धेच्या पवनार येथील धाम नदीपात्रात सेलू तालुक्याच्या झडशी येथील तीन युवक पूर पाहण्याकरिता आले. तिघांपैकी दोन मित्रांनी पाण्यात पोहण्याकरिता उडी घेतली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडू लागले. आणि पुढे अघटित घडले.

खरं तर धरणाच्या पाण्याचे विसर्ग आणि पावसाच्या संततधारमुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून पूर पाण्यासाठी आणि पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र तरीही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पर्यटन स्थळावर गर्दी करून अश्या काही नागरिकांच्या या बेजबाबदार वागत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. अशातच एका युवकाचा अति धाडस करण्यामुळे मृ’त्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

गिरणा नदीला भला मोठा पुर आला होता. तिथे शेकडो नागरिक व तरुण मुलांचे ग्रुप्स जमलेले होते. यातील काही अतिउत्साही तरुण पोहण्यासाठी आले होते मात्र पाण्याचा वेग पाहून त्यांनी आधीच माघार घेतली. मात्र त्यातील एका अतिउत्साही तरुणाने पाण्याचा अंदाज घेऊनही पुलावरून थेट पुरात उडी घेतली. त्यानंतर बराच वेळ हा युवक सापडला नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. खरं तर उडी मारल्यावर हा तरुण दिसलाच नाही, कारण पाण्याला प्रवाह खूप असल्यामुळे तो वाहून गेला होता. या तरूणाचा स्टंटबाजी चांगलीच महागात पडली. घरातला वयात आलेला पोरगा कुटुंबाला फक्त अति धाडस करण्यामुळे गमवावा लागला. गिरणा नदीला पूर आल्याने पाण्याची पातळी वाढली होती. मात्र तरीही या तरूणाचे नातेवाईक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी याचा शोध घेत होते. अखेर चार दिवसांनी आता या तरूणाचा मृ’तदेह सापडला आहे.

त्यामुळे अतिधाडस, तात्पुरती शायनिंग मारायच्या नादात आपले आयुष्यभराचे नुकसान करून घेऊ नका. किंवा या दुर्गुणामुळे आपले किरकोळ नुकसानही होणार नाही, याची काळजी घ्या.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.