Breaking News
Home / जरा हटके / भर पब्लिकमध्ये जाऊन अश्या प्रकारच्या विनोदी शैलीमध्ये मार्केटिंग करणाऱ्या भाऊंचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

भर पब्लिकमध्ये जाऊन अश्या प्रकारच्या विनोदी शैलीमध्ये मार्केटिंग करणाऱ्या भाऊंचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

‘बोलणाऱ्याची माती विकली जाते, पण गप्प राहणाऱ्याचं सोनं विकल जात नाही’ असं म्हणतात. हे खरं सुद्धा आहे. आपल्यापैकी अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. एखादी वस्तू विकायला आलेली व्यक्ती जर बोलकी असेल तर आपण एखादी क्षुल्लक वाटणारी वस्तू सुद्धा अगदी आवडीने घेतो. त्याउलट निरुत्साही आणि जबरदस्तीने विक्री काम करणारी व्यक्ती मात्र स्वतः जवळच्या महागड्या वस्तू विकण्यात सुद्धा अपयशी ठरते. मुळातच विक्री क्षेत्रात काम करत असताना सतत नवनवीन पद्धतीने स्वतःला आणि उत्पादनांना ग्राहकासमोर सादर करणे हे महत्वाचे असते. तसेच या वेळेस इतरांकडून येणाऱ्या नकारात्मक बोलण्याकडे दूर्लक्ष करत, योग्य त्या सूचना अमलांत आणणं गरजेचं असतं. ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारी, प्रश्न यांचं निवारण करणंही गरजेचं असतं. एकूणच काय तर हे क्षेत्रात तरुन जायचं म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणं आवश्यक ठरत. आज हे सगळं सांगायचं कारण म्हणजे असेच अष्टपैलू गुण असणारे एक विक्रेते दादा आपल्याला व्हिडियोच्या माध्यमातून भेटतात.

त्यांचं नाव आकाश साळुंखे होय. एका मुलाखतीतुन अस कळतं की जवळपास पाच वर्षे ते विक्री क्षेत्रात काम करतात. या काळात त्यांनी जे जे अनुभव घेतले आहेत, त्यांचा वापर ते आपल्या जवळील वस्तूंची विक्री करताना दिसून येतात. त्यांचा वायरल झालेला व्हिडियो सुरू होतो तेव्हा अस लक्षात येतं की स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी विकण्याचे काम ते करत असतात. त्यांच्या पाठीमागे एका गाडीत सगळं साहित्य ठेवलेलं असतं. समोर एका छोट्या टेबलावर कांदा, बटाटा, कोबी आणि हे सगळं किसायची साधनं ठेवलेली असतात. विक्री करताना उत्पादन जेवढं महत्वाचं तेवढंच त्यांचे गुण वैशिष्ट्य समजवून सांगणं महत्वाचं असतं. आकाश ते काम अगदी उत्तम आणि लीलया करताना दिसतात. अर्थात त्यांच्या अनुभवाचा यात मोठा वाटा असणार. ते पहिल्यांदा सगळ्यांना दाखवुन देतात की हे उत्पादन भारतीय आहे आणि चायनीज नाही. चायनीज उत्पादनांविषयी आपली मतं काय आहेत हे वेगळं सांगायला नको. त्यासाठी ते त्यांच्या हातातील किसणी जोरात आपटतात. आपसूकच जे उत्तर अपेक्षित आहे ते मिळतं.

त्यात हे उत्पादन घेतल्याने कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च येत नाही हे सांगायला ही ते विसरत नाहीत. कोणत्याही ग्राहकाला एखादी वस्तू घेऊन त्यावर खर्च करायला लागू नये असं वाटत असतं. ग्राहकांची ही नाडी ओळखून ते हे वैशिष्ट्य अधोरेखित करतात. बरं ते खरंच बोलत असतात. पण त्यांची बोलण्याची ढब, रोजच्या आयुष्यातील उदाहरणं देणं, लोकांना आवडेल अशी शैली असणं यातून हे खरेपण अजून ठसठशीतपणे समोर येते आणि लक्षात राहते. पण असं असलं तरी किंमतीवरून घासाघीस करावी लागणं, ग्राहकांना उत्पादनाविषयी खात्री पटवून देण्यात खूप मेहनत करावी लागणं आणि आलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देणं हे काही विक्रेत्याला न सुटलेल्या गोष्टी आहेत. या व्हिडियोत याचाही प्रत्यय येतोच. पण विक्री कौशल्य उत्तम असणारे आकाश याही प्रश्नांना उत्तरं देतात. एका काकांना उत्पादनाच्या किमतीविषयी समजावून सांगताना त्यांच्या ‘९०’ चं उदाहरण देतात. तरीही काकाही कच्चे गुरुचे चेले नसतात. पण तरीही आकाश यांच्या हजरजबाबीपणामुळे हा प्रश्न उत्तमरीत्या सांभाळतात. त्यांचं हे काम अविरतपणे सुरू असतं.

मुलाखतकार जेव्हा त्यांना त्यांच्या दिनचर्येविषयी विचारतात तेव्हा कळतं की आकाश हे काम जवळपास आठ तास करतात. सतत अशा प्रकारे काम करणं म्हणजे मानसिकदृष्ट्या थकून जाणं. पण हाडाचा विक्रेता मात्र दरदिवशी पुन्हा नव्या जोमाने काम करत असतो. आकाश हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येतील. खरं तर हा व्हिडियो तसा सात मिनिटांचा आहे. पण जर तुम्हाला संधी मिळाली तर हा व्हिडियो नक्की बघा. कारण अर्थ नसलेल्या गोष्टी बघण्यापेक्षा आकाश यांचं विक्री कौशल्य डोळ्याखालून घालणं केव्हाही चांगलं. काय माहीत, आपल्यातील अनेकांना या व्हिडियोमुळे विक्री करताना मदतच होईल. कारण आपलं काम कोणतंही असो, हुद्दा कोणताही असो, विक्री कौशल्य प्रत्येकात थोड्याफार प्रमाणात असणं आवश्यक असतं. तेव्हा हा व्हिडियो वेळ काढून नक्की बघा आणि आनंद घेत घेत नवनवीन गोष्टी शिका.

बरं ज्या गोष्टी आपण शिकला आहात त्या कमेंट्स मध्येही लिहा. जेणेकरून बाकीच्यांनाही त्याचा फायदा होऊ शकेल. कारण नोकरी, व्यवसाय, उदयोग असं कोणतंही क्षेत्र असू दे, विक्री कौशल्य असलेला माणूस नक्कीच उत्तम प्रगती करताना दिसून येतो. या लेखाच्या माध्यमातून आकाश यांना त्यांच्या कौशल्यासाठी सलाम. आपल्याला हा लेख कसा वाटला ते कळवायला विसरू नका. तसेच आपण वाचक म्हणून आम्हाला जे सतत प्रोत्साहन देत असता त्याबद्दल मनापासून धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *