Breaking News
Home / मराठी तडका / मृणाल दुसानिसचा पती आहे अमेरिकेत कामाला, बघा मृणालबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी

मृणाल दुसानिसचा पती आहे अमेरिकेत कामाला, बघा मृणालबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी

ह्या अभिनेत्रीने आपल्या पहिल्याच सीरिअलने प्रेक्षकांच्या मनात घर केले. आपल्या गोड चेहरा आणि स्मित हास्याने तिने प्रेक्षकांना मोहून टाकले. तिने आपल्या सरळ साध्या स्वभावाने आणि सहज अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती अभिनेत्री म्हणजेच मृणाल दुसानिस. मृणालचा जन्म २० जून १९८८ साली नाशिकला झाला. तिने आपले प्राथमिक शिक्षण नाशिकमधल्या मराठा हायस्कुल येथून पूर्ण केले. नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून तिने मासकॉम आणि जर्नालिसमची पदवी प्राप्त केली. बालपणापासूनच तिला अभिनयाची आवड असल्यामुळे ती एकांकिका आणि नाटकांमध्ये भाग घ्यायची. त्यामुळे अभ्यासाबरोबरच तिला अभिनयाची कला सुद्धा आवडू लागली. शालेय महाविद्यालयीन राज्यनाटकांमधून तिने अनेक नाटकांत भाग घेतला. बॉलिवूडमधील उमराव जान हि तिची सर्वात आवडती अभिनेत्री असून तिच्या अभिनयाला प्रेरित होऊन आपणही अभिनयक्षेत्रात करियर करायचा निर्णय घेतला. महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनयक्षेत्रातच करियर करायचे असे तिने पक्के केले. त्यामुळे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मुंबईला आली.

 

इथे आल्यावर तिने अनेक ऑडिशन्स दिल्या. ह्या प्रयत्नानंतर तिला पहिली सीरिअल मिळाली ती म्हणजे एकता कपूरच्या झी मराठीवरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’. हि मालिका खूप हिट झाली. ह्यात तिने क्षमिका नावाच्या मुलीची भूमिका निभावली होती. प्रेक्षकांना तिची भूमिका खूप आवडली. ह्या मालिकेतून तिच्यारूपाने मराठी इंडस्ट्रीला एक नवीन, सुंदर आणि सोज्वळ चेहरा मिळाला. त्यानंतर तिची झी मराठी वरील मालिका ‘तू तिथे मी’ खूप लोकप्रिय झाली. ह्या मालिकेत ती अभिनेता चिन्मय मांडलेकर सोबत दिसली. ह्यात तिने मंजिरी नावाच्या मुलीची भूमिका निभावली होती. आपल्या दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या स्वभावाच्या मुलींच्या भूमिका साकारून तिने आपल्या अभिनय क्षमतेची चुणूक दाखवली. अभिनयासोबतच तिला नृत्याची आवड असल्यामुळे झी मराठी वरील ‘एकापेक्षा एक’ ह्या नृत्यस्पर्धेत तिने भाग घेतला. २०१३ मध्ये केदार शिंदेच्या ‘श्रीमंत दामोदर पंत’ ह्या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटांत पर्दापण केले. ह्या चित्रपटात तिला भरत जाधव, स्व. विजय चव्हाण ह्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. ह्याच दरम्यान तिचे ‘रक्तपुष्प’ हे नाटक देखील खूप गाजले. त्यानंतर तिने ‘रिमोट माझा’ आणि ‘आम्ही सारे खवय्ये’ ह्यासारख्या टीव्ही शो मध्ये सूत्रसंचालनाचे काम फार सुंदर पद्धतीने केले. त्यानंतर तिला २०१५ मध्ये कलर्स मराठीच्या ‘अस्सल सासर सुरेख बाई’ ह्या मालिकेत अभिनेता संतोष जुवेकर सोबत काम करण्याची संधी मिळाली. ह्यात तिने जुहीचे कॅरॅक्टर निभावले होती. तिचे हे कॅरॅक्टर सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडले.

 

ह्या मालिकेदरम्यानच तिचे लग्न अमेरिकेत राहणाऱ्या नीरज मोरेशी ठरले. २५ फेब्रुवारी २०१६ ला दोघांचे लग्न झाले. नीरज हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून अमेरिकेत राहतो. नीरज हा मूळचा पुण्याचा. लग्न जुळतेवेळी दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. नीराजला मृणाल अभिनेत्री आहे असे समजल्यावर त्याने तिचे फोटो सोशिअल मीडियावर सर्च करायला सुरुवात केली. त्यातील तिचे अनेक फोटो हे साडी आणि सलवार कमीजवरच असल्याने त्याने पुढच्या भेटीत ‘तू कधीच वेस्टर्न कपडे घालत नाहीस का’ असा प्रश्न विचारला होता. तिचा हाच साधेपणा नीरजला भावला. लग्नानंतर काही काळ ती अमेरिकेत राहिली. लग्नादरम्यानच्या काळात तिला ‘अस्सल सासर सुरेख बाई’ हि मालिका अर्धवट सोडून अमेरिकेत यावे लागले होते. परंतु चित्रपटसृष्टीतील ओढ तिला पुन्हा मुंबईला घेऊन आली. इथे परतल्यावर तिने ‘हे मन बावरे’ मालिकेमधून दमदार पुनरागमन केले. ह्या मालिकेतील तिची शशांक सोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मृणालला पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा कडून खूप खूप शुभेच्छा.

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *