उन्नाव ची 29 वर्षाची नुपूर चौहान हिचे नाव १५ दिवस आधी कोणी ओळखत नव्हते. परंतु आता सर्व ओळखतात. कारण नुपूरने कौन बनेगा करोडपती मध्ये भाग घेतला. तिने अमिताभ बच्चन ह्यांच्या 12 प्रश्नांची ऊत्तरे बरोबर दिली आणि 12 लाख 50 हजार रुपये जिंकले. आता आपण विचार करीत असाल की , करोडपती तर बनली नाही. मग काय खास गोष्ट आहे, तर आपल्याला सांगतो की नुपूर अपंग आहे. ती व्यवस्थित चालू शकत नाही. शारीरिक रूपाने वेगळी आहे. तिचं जीवन तुमच्या आमच्या पेक्षा खुप वेगळं आहे. चला जाणून घेऊया नुपूर बद्धल काय घडलं होतं ते.
काय आहे नुपूरची कथा?
‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर बसण्यासाठी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट चे बरोबर ऊत्तर द्यावे लागते. नुपूरने जसं या प्रश्नाचे बरोबर ऊत्तर दिले आणि हॉट सीट साठी नीयुक्त झाली, तसे सर्व बघतच राहिले. अमिताभ बच्चन स्वतः उठून नुपूरच्या जवळ पोहचले आणि तिला हॉट सीट पर्यंत घेऊन आले. नुपूरने आपली कथा सांगितली. तिने सांगितले की, मी जन्माला आली तेव्हा रडली नव्हती. डॉक्टरांना वाटलं की मी मृत आहे. जन्माला आल्यावर लगेच त्यांनी मला कचरापेटीत फेकून दिले. नुपूरची आजी आणि मावशी हॉस्पिटल मध्ये पोहचले, तेव्हा त्यांनी मला कचरापेटीतून उचलले. तीच्या पाठी थाप मारली, जेणेकरून ती रडेल. आजीची शक्कल कामी आली, छोटी नुपूर रडू लागली. ती मृत नव्हती, जिवंत होती. ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे तिचा आवाज येत नव्हता. आणि इकडे डॉक्टरांनी बिना पडताळणी करताच तीला मृत म्हणून घोषित केले होते.
आजीच्या मारण्याने नुपूरच रडणं सुरू झालं, नंतर सतत 12 तास रडत राहीली. नुपूरने या शो मध्ये सांगितले की तिला ‘मिक्स्ड सेरेब्रल पल्सी’ आहे. हा आजार ज्या मुलांना होतो ती मुले इतर मुलांच्या तुलनेत थोडी मागे असतात किंवा यांच्या शरीराचा एखादा भाग काम करत नाही. नुपूर ची बुद्धी बरोबर आहे पण ती चालू शकत नाही. ती म्हणाली डॉक्टरांनी कावीळ समजून चूकीचे इंजेक्शन दिले होते. त्यांनी योग्य उपचार केले नव्हते. त्यामुळे तीची केस आणखी बिघडली. डॉक्टरांच्या बेपरवाई मुळे नॉर्मल मुलांसारखी ती चालू शकत नाही. ती व्हिलचेअरचा वापर करत नाही. तिचे म्हणणे आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत ती आपल्या पायावर चालण्याचा प्रयत्न करेन. ती म्हणते, ‘शेवटच्या श्वासापर्यंत मी चालेन , व्हिलचेअर चा वापर करणार नाही. मला सहानुभूती नको ,सन्मान पाहिजे. कितीही अंधार असुदे, झांशीच्या राणी सारखी उठून माझ्यासाठी सर्व बदलेन.’ नुपूर शिक्षिका आहे. ती लहानपणा पासूनच अभ्यासात हुशार होती. 12वी ला मेरीट मध्ये आली होती. पहिल्याच वेळेत बी.एड. साठी नियुक्त झाली होती. बालवाडीत मुलांना शिकवायची. 10वी च्या मुलांना मोफत शिकवते. नुपूरने आपल्या अपंगत्वा मुळे हार मानली नाही, पुढे जात राहीली,आज सुद्धा पुढे जात आहे , ती स्टार आहे.