छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा रामायण सुरू झाल्याने जुना काळ परत आला आहे. लॉकडाऊनमुळे घरात कैद झालेल्या लोकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा रामायण दूरदर्शनवर प्रसारित केले जात होते. रामानंद सागर ह्यांच्या रामायणात काम केलेल्या कलाकारांनी त्यांची व्यक्तिरेखा इतकी सुंदरपणे बजावली की ते सर्वांच्या हृदयात बसले आहे.
प्रभू श्रीरामाची व्यक्तिरेखा साकारणारे अरुण गोविल (Arun Govil) अजूनही राम म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे, लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी आणि माता सीताची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया अजूनही लोकांच्या नजरेत देव आहेत. याखेरीज असे बरेच कलाकार होते जे त्यांच्या भूमिकेमुळे अमर झाले आहेत, पण आज त्यांच्या ऐतिहासिक शोच्या दुसर्या प्रवासासाठी ते साथीदार होऊ शकले नाहीत. आम्ही तुम्हांला रामायण सिरियलमधील अश्याच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत, जे आता या जगात नाही.
दारा सिंग
हनुमानाच्या भक्तीशिवाय भगवान राम यांचे नाव अपूर्ण आहे. बजरंग बलीची व्यक्तिरेखा साकारणारे दारा सिंह आज आपल्यात सोबत नाहीत. त्यांच्या अभिनयाने लोकांच्या हृदयात अशी जागा निर्माण केली आहे कि, त्यांच्या शिवाय लोकांना पवनपुत्र हनुमानाच्या भूमिकेत दुसरं कोणी आवडत नव्हते. रामायण आणि इतर कार्यक्रमांमध्ये त्यांनी हनुमानची भूमिका साकारली. यानंतर, १२ जुलै २०१२ रोजी दारा सिंग नी या जगाला निरोप दिला. शेवटच्या वेळी त्यांनी आपल्या मुलाकडून रामायण पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मुकेश रावल
जर विभीषणने प्रभू श्रीरामाला मदत केली नसती तर भगवान श्रीरामाला रावणाला संपविणे थोडे अवघड झाले असते. रामायणची ही महत्वाची व्यक्तिरेखा साकारणारा मुकेश रावल आता या जगाचा भाग नाही. मुकेश रावल यांनी विभीषणची भूमिका इतक्या सहजतेने साकारली कि लोक त्यांच्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडले. त्यांनी अनेक हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केले. पण त्यांचा मृत्यू खूप दुःखद होता. २०१६ मध्ये रेल्वेमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
ललिता पवार
रावण रामायणचा खलनायक होता, परंतु पडद्यावरील लोकांनी जितका रावणाचा द्वेष केला नाही, तितका मंथराचा केला. ललिता पवार यांनी राणी कैकयीच्या दासी मंथाराची भूमिका अशी उत्तमरीत्या निभावली कि लोकांनी तिला मंथरा म्हणून स्वीकारण्यास सुरवात केली. केवळ रामायणातच नाही तर हिंदी सिनेमातही तिने एक जबरदस्त आणि धोकादायक खलनायिका म्हणून आपली ओळख निर्माण केली. २४ फेब्रुवारी १९९८ रोजी ललितानेही या जगाला निरोप दिला.
विजय अरोरा
रावणपुत्र मेघनादने लक्ष्मणला जखमी केले तेव्हा प्रभू श्रीराम ह्यांना खूप दुःख झाले. रावणपुत्र मेघनादची भूमिका विजय अरोरा यांनी केली होती. त्याचे पात्र लोकांना खूप आवडले. याशिवाय विजयने हिंदी चित्रपटातही वहीदा रहमान, परवीन बॉबी, मौशमी चटर्जी, झीनत अमान या सुंदर आणि शक्तिशाली अभिनेत्रींसोबत काम केले आहे. २००७ मध्ये पोटाच्या कर्करोगामुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला.
श्याम सुंदर कालीन
सुग्रीवाने आपला भाऊ याने केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी भगवान श्री रामची मदत घेतली. सुग्रीव आणि बालीची ही व्यक्तिरेखा श्याम सुंदरने खूप छान साकारली होती. या वर्षाच्या एप्रिलमध्ये श्यामने या जगाला निरोप दिला. श्यामही रामायणच्या इतका जवळ होता की रामचरित मानस पाठ करताना त्याचा मृत्यू झाला.