Breaking News
Home / बॉलीवुड / भडक मेकअपनंतर पुन्हा ट्रॉल झाली रानू मंडल, स्टेजवर पोहोचली आणि

भडक मेकअपनंतर पुन्हा ट्रॉल झाली रानू मंडल, स्टेजवर पोहोचली आणि

‘एक प्यार का नगमा है…’ गाण्याने सोशिअल मीडियावर लोकप्रिय होणाऱ्या रानू मंडलचे आयुष्य पूर्णतः बदलले आहे. कधी काळी रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन पोट भरणारी रानू मंडल एक गाणं वायरल झाल्यामुळे सिंगिंग सेन्सेशन बनून पुढे आली. एका गाण्याने इंटरनेटवर स्टार बनलेली रानू मंडल नेहमीच चर्चेत असते. इतकंच नाही तर तिच्या आवाजाच्या जादूची बॉलिवूडमध्ये सुद्धा एंट्री झालेली आहे. तिला अनेक बॉलिवूड कार्यक्रमात बोलावण्यात सुद्धा आले. अनेक रिऍलिटी शो मध्ये तिने गाणे गाऊन आपल्या आवाजाची कमाल दाखवली. परंतु ती रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेत असते. काही दिवसापूर्वीच रॅम्प वॉक दरम्यान भडक मेकअप केल्यामुळे तिला खूप ट्रॉल करण्यात आले होते. सोशिअल मीडियावर नेटकरी मंडळी तिच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून असतात. जसे जसे रानू मंडल प्रसिद्धीच्या शिखरावर जात आहे, काही ना काही असं होत आहे ज्यामुळे ती नेहमी चर्चेत असते.

आता रानू मंडलचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ती आपले गाणेच विसरून गेली आहे. रानू मंडलला हिमेश रेशमियाने आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. त्याचे ”तेरी मेरी कहाणी’ हे गाणी खूप लोकप्रिय झाले. ह्या गाण्यानंतर रानू मंडलला खूप लोकप्रियता मिळाली. खूप लोकं तिला ओळखू लागले. ज्या गाण्याने रानू मंडलचे नशीब बदलवले तेच गाणं जेव्हा स्टेज वर गायचे होते तेव्हा ती त्या गाण्याचे बोलच विसरून गेली. रानू मंडल एका कार्यक्रमात पोहोचली होती, जिथे पत्रकार बरखा दत्त कार्यक्रमाची होस्ट होती. दोघेही एकाच मंचावर एकत्र येऊन गप्पा मारत असतानाच बरखा दत्तने रानू मंडलला गाणे गाण्यासाठी रिक्वेस्ट केली, त्यावर रानू मंडलने सांगितले कि, ‘जे मी हिमेशजी सोबत थोडेसे गायले आहे, ते गाऊ का?’ त्यावर बरखा दत्त बोलली कि, “हो, तेच गाऊन दाखवा.” इतके बोलून बरखा दत्तने आपल्याकडील माईक रानू मंडलच्या हातात दिला. रानू मंडल गाणे गाण्यासाठी तयार झाली. तेव्हाच अचानक ती काही सेकंदासाठी गप्प झाली आणि विचार करू लागली. आणि इंग्रजीत म्हणाली कि “ओह माय गॉड, मी गाणे विसरली.” रानू मंडलचा हा व्हिडीओ सोशिअल मीडियावर खूप वेगाने वायरल होत आहे. ज्यानंतर काही लोकांनी तिला ट्रॉल सुद्धा केले आहे.

सिनिअर पत्रकार बरखा दत्त सोबत रानू मंडलचा हा व्हिडीओ खूप लोकप्रिय होत आहे. सोशिअल मीडियावर शेअर केलेल्या ह्या व्हिडिओला अनेकांनी शेअर केले आहे. दोन दिवसांतच ह्या व्हिडिओला २३ हजार लाईक्स मिळाले आहेत. ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे कि रानू मंडलला जेव्हा बरखा दत्तने कोणतेही गाणे गाण्यास सांगितले तेव्हा रानू मंडलने हिमेशसोबतचे गाणे गाते म्हणून सांगितले. त्यानंतर जेव्हा ती गाणे गाण्याचा प्रयन्त करू लागली तेव्हा ती स्टेजवरच गाणे विसरून गेली. मागील काही दिवसांमध्ये रानू मंडलचा एक फोटो वायरल झाला होता. ज्यात ती भडक मेकअप मध्ये दिसली होती. ह्या फोटोमुळे रानू मंडलला खूप ट्रॉल केले गेले. ह्यावर तिच्या मुलीने आपली प्रतिक्रिया दिली. रानू मंडलची मुलगी एलिझाबेथने सांगितले कि, “आईला अश्या प्रकारे ट्रॉल केल्यामुळे मी खूप दुखी आहे. आईला नेहमी अटीट्युडची समस्या राहिली आहे. ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.”

बघा हा वायरल होत असलेला व्हिडीओ 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.