बॉलिवूडमध्ये रियल कपल पेक्षा चित्रपटातील कपल्सच जास्त लक्षात राहतात. त्यांची केमिस्ट्री आणि त्यांचे किस्से तर प्रेक्षकांनाही आवडतात. उदाहरण द्यायचे झालेच तर सलमान ऐश्वर्या, शाहिद करीना ह्यांचेच घ्या. एकेकाळी ज्यांची केमिस्ट्री इतकी चांगली होती कि एकमेकांशिवाय ते राहू शकत नव्हते, आता मात्र एकमेकांचे चेहरेही पाहत नाहीत. बॉलिवूडची हि दुनियाच अशी आहे कि आज ज्याच्याशी चांगलं आहे, काय माहिती उद्या त्याच्याशी वाकडं होईल ते. तर आजच्या लेखात आपण अश्याच ऑन स्क्रीन जोडीबद्दल बोलणार आहोत, जी चित्रपटांत तर सुपरहिट ठरलीच. परंतु प्रेक्षकांनाही ह्या जोडीच्या छोट्या छोट्या गॉसिप्स मध्ये रस होता. चला तर जाणून घेऊया.
1) बॉलिवूडची खूप सुंदर आणि मिस्टिरियस अभिनेत्री रेखाचा गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये जन्मदिवस होता. तिचे जीवन सोपे नव्हते, काँट्रोव्हर्सिज बरोबर तिचे जुने नातं आहे. रेखा आणि अमिताभ बच्चन बॉलिवूडचे हे असे स्टार कपल आहेत की, ज्यांचे ऑन स्क्रीन पेक्षा ऑफ स्क्रीन किस्सेच जास्त चर्चेत राहिलेत. तिच्या मुलाखतीत सुद्धा अमिताभ बच्चनचा जास्त उल्लेख असतो. सिमी अगरवालला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ सोबतच्या आपल्या इक्वेशन विषयी खूप खुलासे केले. जाणून घ्या खुलासा जो पूर्ण दुनिया पासून लपवून ठेवलाय रेखाने.
2) अमिताभला पाहून विसरून जात असे डायलॉग
मुलाखतीत बोलताना ती म्हणाली अमिताभ सोबत काम करणे किंवा समोर उभे राहणे सोपे नाही. तिने हेही सांगितले की, पहिल्या चित्रपटाच्या वेळी अमिताभ समोर ती डायलॉग विसरून जायची.
3) रेखावर अमिताभचा प्रभाव
रेखाने हेही कबूल केले की अमिताभ बच्चन वर ती खूप खुश आहे, म्हणजे ती त्याच्या साठी वेडी आहे. तिने अमिताभ बच्चन विषयी बोलताना हेही सांगितले की, सर्व गुण एकाच माणसात असणे अशी व्यक्ती तिने पहिल्यांदा पाहिली, ती म्हणजे अमिताभ बच्चन.
4) जयाने भेट घडवून आणली अमिताभ बरोबर
माहितीनुसार, जया बच्चन आणि रेखा एकाच बिल्डिंग मधे रहात होत्या, आणि त्या चांगल्या मैत्रिणी होत्या. जयानेच आपला बॉयफ्रेंड अमिताभ बरोबर रेखाची भेट घडवून आणली होती.
5) जयाने लग्नाला नाही बोलावले
अमिताभ आणि रेखा सोबत काम करत असताना त्यांची जवळीक वाढली ती जयाला खटकत होती. त्याच वेळी जया आणि अमिताभचे लग्न झाले, पण जयाने रेखाला लग्नाला बोलावले नाही. म्हणून रेखाला खूप वाईट वाटले.
6) नीतू -ऋषीच्या लग्नात झाला ड्रामा
नीतू सिंग आणि ऋषी कपूरच्या लग्न समारंभाला अमिताभ आपली पत्नी जया सोबत तिथे पोहचले. काही वेळाने सुंदर साडी नेसून आणि बिंदी लाऊन रेखा तिथे आली. तिच्या भांगातील सिंदूर पाहून सर्वांचे लक्ष तिच्या कडे वेधले गेले. सर्वांच्या नजरा तिच्यावर रोखून होत्या आणि प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न होते. खूप वेळ जयाने स्वतःला रोखून धरलं पण काही वेळानंतर तिचे रडू आवरेना आणि ती रडू लागली.
7) सिंदूर वर उत्तर
जेव्हा रेखाला सिंदूर विषयी विचारले तर तिने उत्तर दिले की, ती शुटींवरून इथे आली आहे. अशाप्रकारे नंतर खूप वेळा तिला सिंदूर लावलेली असताना विचारपूस केली तर तिने सांगितलं की ती ज्या शहरातून आहे तिथे मुलीने सिंदूर लावण्याची फॅशन आहे.
8) अमिताभ साठी प्रेम कबूल केले
रेखाला एका मुलाखतीत विचारले की अमिताभवर प्रेम करते. तर त्यावर ती म्हणाली अमिताभवर कोण प्रेम नाही करीत. सर्वानाच तो आवडतो. ती हे वाक्य यानंतरच्या खूप मुलाखतीत बोलली.