रितेश देशमुख ह्या १७ डिसेंबरला ४१ वर्षाचा झाला आहे. मस्ती, हाऊसफुल, ग्रँडमस्ती सारखे हिट चित्रपट देणारा रितेश देशमुख आपल्या खासगी जीवनात खूप यशस्वी आहे. रितेशच्या जन्मदिवसाच्या निमित्त बघा त्याची आणि जेनेलियाची लव्ह स्टोरी. रितेश आणि जेनेलिया पहिल्या वेळेस २००२ ला आपल्या पहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ च्या शूटिंग दरम्यान भेटले होते. त्यांची भेट हैद्राबाद च्या एअरपोर्ट वर झाली होती. रितेश ला अगोदरच सांगण्यात आलो होते कि त्याची हिरोईन त्याची वाट बघत असेल. परंतु जेव्हा तो एअरपोर्ट वर पोहोचला तेव्हा जेनेलियाचा स्वभाव पाहून तो हैराण झाला. जेनेलियाला माहिती होते कि हा हिरो मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. तिला वाटले कि रितेशला खूप घमंड असेल. ह्याशिवाय तो भाव खाणार. जेनेलिया ने स्वतःहून रितेशला हाक नाही मारले. रितेश ने स्वतःहून पुढे होऊन जेनेलियाचा हाथ मिळवला. जेनेलिया हाथ मिळवून त्याच्याकडे न पाहता इथे तिथे बघू लागली. रितेशला जेनेलियाचा पहिल्या भेटीत इतकं भाव खाणे आवडलं नाही.
पण हळू हळू जेव्हा त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग चालू झाले तेव्हा जेनेलियाला जाणवलं कि रितेश मनाने खरंच खूप चांगला आहे. त्याच्यात जरा सुद्धा गर्व वैगेरे नाही आहे. तो पूर्ण टीम सोबत मिळून राहतो. दोघांमध्ये मैत्री वाढू लागली. सेट वर दोघेही खूप गप्पा मारत. २४ वर्षाचा रितेश आणि १६ वर्षाची जेनेलियाशी आर्किटेक्चर बद्दल गप्पा मारायचा आणि जेनेलिया त्याला आपल्या शिक्षणाबद्दल सांगत असे. त्या वेळी दोघांना काय माहिती होते कि एक दिवस हे दोघेही पती पत्नी बनणार ते. हैद्राबाद मधील शूटिंग संपल्यानंतर जेव्हा रितेश घरी परत आला तेव्हा त्याला जेनेलियाची कमी जाणवू लागली. तो तिला खूप मिस करू लागला. पण त्याला वाटले कि एका मुलीला इतक्या लवकर फोन करणे ठीक राहणार नाही. तिथे जेनेलिया सुद्धा रितेशच्या बाजूने पूर्णतः आकर्षित झाली होती. असं नाही आहे कि दोघांना अचानकच एकमेकांसोबत प्रेम झाले. हा प्रवास खूप जास्त चालला. दोघांना एकमेकांच्या मैत्रीची सवय झाली होती. त्यांना कळलंच नाही कि, केव्हा त्यांना एकमेकांसोबत प्रेम झाले ते.
ह्यानंतर दोघांनी ‘मस्ती’ चित्रपटात सुद्धा काम केले. ह्या दोघांच्या नात्याला पहिल्या चित्रपटापासूनच सुरुवात झाली होती. परंतु त्यांनी ह्या बातम्या मीडिया मध्ये येऊ दिल्या नाहीत. त्यांच्या मते नात्याची सुंदरता हीच राहिली कि त्यांना एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी कधीच महागड्या कँडल लाईट डिनर किंवा गिफ्ट्स ची आवश्यकता पडली नाही. त्यांच्या साठी एकमेकांचे प्रेमच सर्व काही होते. जे काही न बोलताच सर्व काही समजून गेले. शेवटी ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले. थक्क करणारी गोष्ट म्हणजे ते लग्नाच्या अगोदर एकमेकांना १० वर्ष डेट करत होते, परंतु मीडियामध्ये ह्यांच्या अफेअरच्या कोणत्याच बातम्या नाही आल्या. त्याच महिन्यात २४ फेब्रुवारीला त्याचा चित्रपट ‘तेरे नाल लव्ह हो गया’ हा चित्रपट सुद्धा रिलीज झाला होता. सर्व प्रेक्षक ह्या नवविवाहित जोडीचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट पाहण्यास खूप उत्सुक सुद्धा होते. २४ नोव्हेंबर २०१४ मध्ये रितेश पहिल्यांदा पिता बनला.
जेनेलियाने मुलाला जन्म दिला आणि आता त्यांचे जीवन त्याच मुलगा ‘रिआन’ च्या भोवती फिरतं. रितेश तर हे पण सांगतो कि रिआन चे डायपर बदलणे आणि पॉटी साफ करण्यामध्ये आता तो एक्स्पर्ट झाला आहे. तो म्हणतो कि तो आणि जेनी रिआन बद्दल इतक्या गोष्टी करतात कि कदाचित आता ते त्याच्या लग्नाची सुद्धा पूर्ण प्लॅनिंग करून झाले असतील. रिआन सुद्धा ७ वर्षाचा झाला आहे आणि त्यांना १ जून २०१६ रोजी दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव ‘Rahyl’ ठेवलं. आज जिथे, बॉलिवूडमध्ये जास्त बातम्या ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या येत आहेत. तिथे रितेश आणि जेनेलिया एकमेकांशिवाय दुसऱ्या कशाबद्दल विचारसुद्धा करत नाही. ह्यांचे कोणा दुसऱ्या सोबत अफेअर्स किंवा ब्रेकअप बद्दल कधीच कोणती बातमी आली नाही. रितेश ने ज्या मुलीसोबत प्रेम केले त्याच मुलीसोबत लग्न सुद्धा केले. असं म्हणतात कि सध्याच्या काळात रितेश सारखं प्रतिव्रता हिरो बॉलिवूड मध्ये कदाचितच असेल.