प्रेम म्हटलं कि मग त्याला नाही वयाचे बंधन असते आणि नाही जाती धर्माचे. इतकंच काय काही देशाचेही बंधन नसते. आजच्या ऑनलाईन युगात अनेक अशी जोडीपी आहेत ज्यांचे इंटरनेटवर प्रेम होऊन खऱ्या आयुष्यात लग्न झालेले आहेत. तर काहींना फसवलं गेलेले सुद्धा आहे. परंतु आजच्या लेखात आम्ही तुम्हांला अश्या प्रेम बद्दल सांगणार आहोत जिथे साता समुद्रपार आलेली मुलगी आपल्या भारतातील मराठमोळ्या मुलाच्या प्रेमात पडते. ते सुद्धा कोणत्याही ऑनलाईन किंवा सोशिअल मीडियाच्या चॅटिंग द्वारे नव्हे. तर त्याच्या खऱ्या खुऱ्या स्वभावावर भाळून. तर चला पाहूया हि अजब प्रेम कहाणी. वडोदरा येथे एक विवाहसोहळा अटेंड करण्यासाठी रशियात राहणारी तरुणी कतरीना हि तिची मैत्रीण जुलिया सोबत भारतात आली होती. येथील लग्नसोहळा पाहून दोघीही प्रभावित झाल्या. इथल्या पाहुणचाराने त्या इतक्या भारावून गेल्या कि, कतरीनाने भारतातच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. खरंतर कतरीना भारतात तिच्या एका मित्राच्या भावाच्या लग्नासाठी आली होती. परंतु येथे आल्यावर ती विवाहपद्धती आणि भरतीय संस्कृतीच्या प्रेमात पडली. खरंतर तिच्या मित्राने लग्नादरम्यान त्याच्या एका मित्राला त्यांचा पाहुणचार करण्याची जबाबदारी सोपवली. लग्नसोहळ्यादरम्यान तिचा पाहुणचार करणारा मराठमोला विकास पाटील ह्याच्या ती प्रेमात पडली.
कतरिनाच्या मित्र विशालसिंह लालसिंह ठाकोर, जो तिच्यासाठी भावासारखा आहे, त्याच्यामुळेच कतरीना आणि विकासची भेट झाली होती. त्याने कतरीना आणि विकास दोघांची भेट कशी झाली ह्याबाबत सांगितले, “मी २०१२ साली रशियाला स्टडी टूर साठी गेलो होतो. आणि त्यावेळी तिथे माझी काही मुलींशी ओळख झाली होती. तेव्हापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. गेल्यावर्षी मी माझ्या भावाच्या लग्नासाठी त्यांना इथे आमंत्रित केले. कतरीना आणि ज्युलिया ह्या दोघींना आपली भारतीय संस्कृती पाहण्याची खूप इच्छा होती. भारतीय संस्कृती पाहिल्यानंतर त्या खूप प्रभावित झाल्या. भावाचा लग्नसोहळा म्हटले म्हणजे मी व्यस्त असणार. आणि मला माझ्या ह्या परदेशी मैत्रिणींची योग्य काळजी घेणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी एक विश्वासू माणूस पाहिजे होता, जो ह्या लग्नसोहळ्यादरम्यान त्यांच्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेईल. ह्यासाठी मी माझा मित्र विकास पाटील ह्याच्यावर दोघींची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली होती. नंतर मला दोघांच्या प्रेमाबद्दल माहिती पडले आणि माझ्या दोघांनाही लग्नासाठी शुभेच्छा आहेत.” विकासने कतरिनाला गोवाच्या ट्रिप दरम्यान प्रपोज केले आणि तिनेसुद्धा त्याचा प्रेमाचा स्वीकार करून तिला कुटुंब असलेले जीवन जगायचे आहे असे सांगितले. विकासने ह्याबाबत कतरिनाच्या डोळ्यांत पाहत सांगितले कि, “पाहताच पहिल्याच क्षणी झालेले प्रेम होते आणि तिने सेकंदामध्ये माझ्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. तिला इथे कुटुंब पाहिजे होते आणि लग्नाअगोदरच तिने माझ्या कुटुंबियांना स्वीकारले होते आणि माझ्या घराचा ताबा घेतला होता. तिचा स्वभाव माझ्या कुटुंबाला आवडला आणि शेवटी आम्ही रशियन आणि भारतीय पद्धतीने माझ्या मूळ गावी बोर्डी येथे लग्न केले.”
भारतीय कुटुंबात सामावून जाण्यात कतरिनाला काहीच कठीण गेले नाही. ती शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला ‘नमस्ते’ म्हणून स्वागत करते. ह्याबाबत कतरीना म्हणते, “दोन्ही संस्कृती जरी वेगळ्या असल्या तरी कामं मात्र जवळजवळ सारखीच आहेत आणि हे सर्व स्वीकारण्यावर अवलंबून आहे. मला असा नवरा पाहिजे होता जो माझी जबाबदारी घेईल, माझी काळजी घेईल आणि मला मदत करेल. विकास माझ्यासाठी अगदी योग्य नवरा आहे. आणि आता मी त्याची बायको म्हणून मला आमचे लग्न इतरांसाठी उदाहरण होईल असे करायचे आहे. लग्न काही विनोद नाही आणि आपल्याला वर्तमानात जगायचे आहे ते सुद्धा भविष्यात काय होईल ह्याचा विचार न करता.” कतरिनाने इथली संस्कृती लगेच स्वीकारली आणि भविष्यासाठी तिचा योजना सुद्धा ठरवल्या. ती तिची केमिस्ट्री मधली पी.एच.डी. रशियामधून पूर्ण करणार. त्यानंतर दोघेही तीन वर्षात दोन्ही देशांत राहणार. ती जरी बायको झाली असली तरी तिला तिच्या जबाबदारीची जाणीव आहे आणि तिला तिच्या कुटुंबाची सुरुवात करायची आहे. तिच्या भावना तिच्या नवऱ्यासाठी त्याच्याइतक्याच असून दोघानांही आयुष्य आता योग्य पद्धतीने मॅनेज करायचे आहे, अशी कतरीना म्हणाली.
तिच्या कुटुंबाने पहिल्यांदाच वडोदरात भेट दिली आणि आपली मुलगी येथे सेटल झालेली पाहून त्यांना देखील आनंद झाला. खरंतर, सुरुवातीला त्यांना हे लग्न मान्य नव्हते. जेव्हा कतरिनाने पहिल्यांदा विकासशी लग्न करणार असल्याचे सांगितले तेव्हा तिच्या आईवडिलांना धक्का बसला होता. विशेषतः तिच्या आजीआजोबांना. त्यानंतर तिला जवळजवळ चार महिने त्यांना मनवण्यात गेले आणि शेवटी तिला भारतात आनंदाने लग्न करतेवेळी पाहण्यासाठी समाधानी झाले. आता कतरीना आणि विकास ह्यांचा सुखाचा संसार चालू आहे. ह्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यातच दोघांना बाळ झाले. आपली संस्कृती सोडून पाश्चिमात्य संस्कृतीचा स्वीकार करणाऱ्या मुलींसाठी हि घटना योग्य उदाहरण आहे. माणसाने काळासोबत नक्कीच बदलत राहिले पाहिजे परंतु त्यासोबत आपली संस्कृती सुद्धा जपली पाहिजे. भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडल्यानंतर कतरीनाने सुद्धा मराठमोळ्या विकास सोबत लग्न करून स्वतःच्या देशापासून दूर सातासमुद्रापलीकडे संसार थाटले. तिला भारतीय कुटुंबात राहायचे आणि भारतीय नववधू प्रमाणे जबाबदारीने संसार करायचा आहे. अश्या ह्या जगावेगळ्या प्रेमकहाणीतल्या जोडप्यांसाठी मराठी गप्पाकडून त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
Mala ek Chan mulagi pahije