Breaking News
Home / बॉलीवुड / ह्या गोष्टीमुळे वेगळे झाले होते सैफ आणि अमृता, करीना नव्हती जबाबदार

ह्या गोष्टीमुळे वेगळे झाले होते सैफ आणि अमृता, करीना नव्हती जबाबदार

हि गोष्ट आहे ८० च्या दशकातील, जेव्हा सैफ अली खान लंडनमधले आपले शिक्षण पूर्ण करून भारतात परतला होता. एका नातेवाईकांच्या सल्ल्यामुळे त्याला एका टीव्ही जाहिरातीत घेतले गेले. हि जाहिरात होती ‘ग्वालियर सुईटिंग’ ची. ह्या जाहिरातीसाठीच सैफ अली खान मुंबईत आला. मुंबईत आल्यानंतर हि जाहिरात काही कारणास्तव रद्द केली गेली. परंतु सैफला आपले करिअर समोर दिसत होते. त्याने चित्रपटात येण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. १९९१ मध्ये राहुल रवैल ह्यांनी त्यांच्या करिअरचा पहिला चित्रपट सैफ अली खानला ऑफर केला, ज्यात त्याची हिरोईन काजोल होती. ह्या चित्रपटाच्या मुहुर्ताच्या वेळी राहुल रवैल ह्यांनी त्यावेळची त्यांची खास मैत्रीण असलेली अमृता सिंगला एका खास फोटोशुटसाठी सेटवर बोलावले. चित्रपटाची सर्व स्टारकास्ट अमृता सिंग सोबत फोटोशूट करत होती. तेव्हा सैफ अली खान आला आणि त्याने अमृता सिंगसोबत एक फोटो काढण्यासाठी विचारले. अमृता सिंगने हि भेट एकदम नॉर्मल प्रकारे घेतली होती. तर दुसरीकडे सैफ अली खान अमृता सिंगसोबत भेटल्यापासून हि भेट विसरूच शकत नव्हता. तो अमृतासोबत पुन्हा भेटण्याची संधी शोधत होता. ह्या प्रयत्नात असताना सैफने कोणत्याप्रकारे अमृताच्या घरचा फोन नंबर माहिती केला आणि त्याने अमृताला फोन केला. त्यानंतर सैफने अमृताला डिनरसाठी विचारले. परंतु अमृताने त्याला स्पष्ट शब्दांत सांगितले कि ती डिनर्स साठी बाहेर जात नाही. परंतु विचारण्याची पद्धत म्हणून तिने सांगितले कि जर तुला यायचे असेल तर माझ्या घरी डिनर्स साठी येऊ शकतोस. मग काय होतं, सैफ अली खान अमृताच्या घरी डिनर साठी गेला. आणि ज्या गोष्टी डिनर्स सोबत सुरु झाल्या त्या संपूर्ण रात्रभर संपल्या नाहीत. ह्या भेटीत सैफ आणि अमृताने खूप गप्पा मारल्या. दोघांनाही हि भेट इतकी आवडली कि सैफ दोन दिवसापर्यंत अमृताच्या घरी होता. सैफ आणि अमृता एकमेकांपासून दूर होऊ इच्छित नव्हते. परंतु जेव्हा चित्रपटाच्या निर्मात्यांचे शूटिंगसाठी फोन आले तेव्हा सैफ अली खान अमृताच्या घरातून निघून शूटिंग सेटवर गेला.


परंतु चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले शेड्युल संपताच सैफला एक खूप मोठा धक्का बसला. त्याला ह्या चित्रपटातून काढून टाकले गेले. कारण होते त्याचे अव्यावसायिक वागणं. सैफ अली खान सेटवर उशिरा यायचा. तो चित्रपटाच्या युनिटचे फोन उचलायचा नाही. आणि गोष्ट तर तेव्हा बिघडली जेव्हा त्याने राहुल रवैल ह्यांना सांगितले कि त्याने हा चित्रपट फक्त ह्यासाठी साइन केला होता कि ह्या चित्रपटाची शूटिंग कॅनडात होणार होती आणि त्याला कॅनडा फिरायचे होते. ह्यानंतर राहुल रवैल ह्यांनी सैफ अली खानला ह्या चित्रपटातून काढून टाकले. आणि त्याच्या जागी कमाल सदानाह ह्याला घेतले. सैफचा पहिला चित्रपट तर त्याच्याकडून सुटला होता परंतु त्याला त्याचे पहिले प्रेम मिळाले होते. सैफ आणि अमृताने त्याच वर्षी लग्न केले. त्यानंतर सैफने १९९३ मध्ये यशराज बॅनरचा ‘परंपरा’ चित्रपटाने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. ह्या चित्रपटानंतर अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी ‘सारा अली खान’ हिचा जन्म झाला. १९९३ ते २००१ पर्यंत सैफ अली खानने जवळजवळ ४० चित्रपटांत काम केले. ह्यापैके अनेक चित्रपट फ्लॉप होते आणि जे सुपरहिट होते ते चित्रपट मल्टीस्टारर होते ज्यात मुख्य अभिनेते सैफ अली खान वर भारी पडले होते. जसे कि ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘कच्चे धागे’, ‘हम साथ साथ है’ ह्यासारखे चित्रपट हिट असूनही सैफवर त्या चित्रपटातील बाकीचे अभिनेते भारी पडले होते.


सैफच्या करिअरला उतरती कळा लागल्याचा परिणाम सैफ आणि अमृताच्या नात्यांमध्ये होऊ लागला होता. अमृता आपल्या पहिलाच चित्रपट ‘बेताब’ पासून सुपरस्टार बनली होती. ज्यावेळी सैफने अमृतासोबत लग्न केले तेव्हा ती करिअरमध्ये यशाच्या शिखरावर होती. तिचे ‘मर्द’, ‘चमेली कि शादी’, ‘नाम’ हे चित्रपट हिट झाले होते. तिने आपल्या करिअरच्या अश्यावेळी फक्त सैफ अली खान सोबत लग्नच केले नाही तर त्याच्यासोबत संसार करण्यासाठी तिने आपले चित्रपट करिअर सुद्धा सोडले. आजच्या घडीला कोणतीच अभिनेत्री असे करणार नाही. इतकंच काय तर सैफ अली खानची दुसरी बायको करीना कपूरने सुद्धा लग्नानंतर चित्रपटांत काम करणे सोडले नाही. एकीकडे सैफ अली खानचे चित्रपट चालत नव्हते आणि दुसरीकडे सैफ अली खानचे रोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रींसोबत नाव जोडले जात होते. त्यापैकी एक होती सोमी अली. असं सुद्धा बोललं जातं कि अमृता सिंगसोबत भेटण्याअगोदर सैफ अली खान अजून दोन मोठ्या अभिनेत्रींसोबत एंगेज होता. ह्या अभिनेत्री होत्या अनु अग्रवाल आणि मूनमून सेन. २००१ साली सैफ आणि अमृताच्या मुलगा इब्राहिमचा जन्म झाला.


त्याचवर्षी त्याचा ‘दिल चाहता है’ हा चित्रपट आला. असं बोललं जाते कि ह्या चित्रपटातील सैफच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हाच चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक निखिल अडवाणी ह्यांनी सैफला ‘कल हो ना हो’ चित्रपटांत घेतले. हा चित्रपट सैफच्या करिअर मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. ह्या चित्रपटात शाहरुख खान असूनही सैफची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. एकीकडे जिथे सैफचे करिअर चांगले बनत होते तर तिथेच दुसरीकडे त्याचा १३ वर्षाचा संसार तुटत चालला होता. त्यांचं नातं खूप कमजोर होत चाललं होतं. सैफच्या आयुष्यात इटालियन मॉडेल रोझा कॅटॅलानोच्या येण्याने त्याचे वैवाहिक जीवन संपूनच गेले. शेवटी २००४ मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंगने एकमेकांना घटस्फो ट दिला. एकीकडे अमृता सिंग आपल्या दोन मुलांसोबत वेगळी राहत होती, तर दुसरीकडे सैफ अली खानने आपली गर्लफ्रेंड रोझा सोबत लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहणं सुरु केले होते. एका मुलाखतीच्या दरम्यान सैफने सांगितले कि अमृता आणि त्याचा घटस्फो टाची किंमत ५ कोटींची होती. ज्यापैकी अडीच कोटी त्याने अमृताला दिले आहेत. सोबत तो प्रत्येक महिना अमृताला एक लाख रुपये देत राहील जोपर्यंत त्याचा मुलगा ‘इब्राहिम’ १८ वर्षाचा होत नाही. सोबत त्याने हे सुद्धा सांगितले कि तो रोज येणाऱ्या बेरोजगारीच्या टोमण्यांपासून वैतागला होता. त्यामुळे त्याने ह्या घटस्फो टाचा निर्णय घेतला. त्याला आपल्या मुलांना भेटायचे होते, परंतु घटस्फो टानंतर त्याला त्याच्या मुलांना भेटायची परवानगी नव्हती. काही वर्षे रोझा सोबत लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर सैफ अली खानला आपल्याहून १० वर्ष छोटी असलेल्या करीना कपूरसोबत प्रेम झाले. करीना सोबत सुद्धा तो काही वर्षे लिव्हइन मध्ये राहिला. शेवटी २०१२ मध्ये त्याने करिनासोबत लग्न केले. करीना आणि सैफ ह्या दोघांना एक मुलगा झाला त्याचे नाव तैमूर ठेवले गेले. जिथे मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम ने वडिलांच्या ह्या नवीन नात्याला स्वीकारले. ते करीना आणि तैमूरसोबत अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसले. तर दुसरीकडे अमृताने आजसुद्धा सैफला माफ केलेले नाही. वेगळे झाल्यानंतर ती नाही कधी सैफ सोबत दिसली आणि नाही कधी त्याच्याबद्दल बोलली.

 

About Rahulya

One comment

  1. I’m grateful for having you as a friend!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *