आपला संजुबाबा म्हटलं कि एकापेक्षा एक किस्से तर आलेच. तुम्ही संजय दत्तच्या आत्मकथेवर आधारित असलेला ‘संजू’ हा चित्रपट पाहिलाच असेल. त्या चित्रपटात संजय दत्तचे अनेक कारनामे तसेच त्याच्या बाबतीत घडलेल्या घटना दाखवल्या गेल्या आहेत. परंतु हि घटना चित्रपटात नाही आहे. ह्या घटनेचा उल्लेख संजय दत्तने हल्लीच कपिल शर्माच्या शो मध्ये केला. आता संजय दत्त आपला नवीन सिनेमा ‘प्रस्थानम ‘च्या चित्रीकरणात व्यस्थ आहे. यात तो बाहुबली नेता बलदेव प्रताप सिंहच्या भूमिकेत दिसेल. संजय दत्त सतत चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसतोय. संजय संपूर्ण टीम घेऊन द कपिल शर्मा शो मध्ये पोहोचले. यावेळी त्याची पत्नी मान्यता दत्त सोबत होती. तेव्हा संजय दत्त ने गौप्यस्पोट केलं, कि गुंडांनी त्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. हा भाग 14 सप्टेंबर ला दाखवण्यात आला.
शो मध्ये कपिल ने संजय दत्त ला विचारलं हि अफवा आहे कि, सिनेमा ‘ मुझे जिने दो’ च चित्रीकरण चालू होतं, आणि गुंडांनी तुमचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता? त्याने सांगितले ‘रूपा’ गुंड त्यावेळी गैंग चालवायचा. मी छोटा होतो त्यावेळी त्याने मांडीवर बसवलं आणि माझ्या वडिलांना विचारले, कि सिनेमा साठी आत्ता पर्यंत किती खर्च केला. त्यांनी सांगितले 15 लाख रुपये. त्यानंतर गुंडाने विचारले जर याला (संजय दत्त) उचलून घेऊन गेलो तर किती द्याल. हे ऐकताच त्याच्या वडिलांचा जीव कासावीस झाला. त्यांनी विचार केला असं खरंच घडू सुद्धा शकते. संजय दत्त म्हणाला त्या गोष्टी नंतर वडिलांनी मला आणि माझी आई नर्गिसला मुंबईला परत पाठवले.
कपिलने चंकी पांडेला पण एका अफवेबद्दल प्रश्न विचारला “आपल्याबद्दल ऐकलय की काम मिळवल्याची धडपड करीत असताना पी सी ओ मध्ये पैसे(कॉइन) टाकून बोलायचेत आणि तुम्ही कॉइनला एक धागा बांधून ठेवत असतं, बोलून झाल्यानंतर तो कॉइन परत बाहेर काढता यावा?” त्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला की मी एसटीडी कॉल मध्ये पण हेच करायचो. हो हि गोष्ट बरोबर आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्चीतो कि, सिनेमा ‘प्रस्थानम ’20 सप्टेंबर ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. संजय दत्त ची पत्नी मान्यता दत्त ही सिनेमा ची निर्माती आहे. या सिनेमात संजय दत्त सोडून अली फजल, सत्यजीत दुबे, अमायरा दस्तूर, जैकी श्रॉफ, चंकी पांडे आणि मनीषा कोईराला सारखे कलाकार दिसतील. सिनेमा ची निर्मिती देवा कट्टा ने केली आहे.