आता आपण कितीही मोठे झाले असलो तरी बालपणीचे सीरिअलचे नाव घेतले कि आपल्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. नव्वदीच्या दशकातील मुलांसाठी असे अनेक टीव्ही शोज आहेत, जे खूप लोकप्रिय झाले आणि आजसुद्धा लोकांच्या लक्षात आहेत. २००० साली दूरदर्शनवर एक सीरिअल खूप लोकप्रिय झाला होता. त्या शो चे नाव होते ‘शाका लाका बूम बूम’. दूरदर्शनवर ह्या शो चे सुरुवातीचे ३० एपिसोड दाखवले गेले. त्यानंतर २००० सालानंतर हा सीरिअल स्टार प्लस वर प्रसारित झाला होता. संजूचे पात्र आणि त्याची जादूची पेन्सिल आज सुद्धा कोणी पाहिली तर कोणालाही आपल्या बालपणीच्या दिवसाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर पाहूया शो मधील त्या बालकलाकार मंडळींचे तेव्हाचे आणि आताचे रूप.
संजू :
‘शाका लाका बूम बूम’ हा सीरिअल एका जमान्यात मुलांचा आवडता सीरिअल होता. ह्या सीरिअलमध्ये मुख्य भूमिका होती ती म्हणजे संजूची. संजूकडे जादूची पेन्सिल असते. आणि तो त्या पेन्सिलने जे चित्र बनवतो ते सर्व खऱ्या रूपात त्या चित्रातून बाहेर येते. त्याकाळी अनेकांना आपल्याला ती पेन्सिल भेटावी असे वाटत होते. संजू आणि त्याच्या मॅजिक पेन्सिलने तर सर्व लहान मुलांना वेड लावले होते. संजूचे हे पात्र साकारले होते किंशुक वैद्य ह्याने. संजूने बॅचलर ऑफ मास मीडियाची डिग्री पूर्ण केली आहे आणि एडव्हर्टाइजमेण्ट मध्ये स्पेशिअलाईजेशन केले आहे. त्याने सांगितले कि, “शाका लाका बूम बूम नंतर मला अनेक शो च्या ऑफर्स आल्या, परंतु मला थोडे थांबायचे होते. मी ठरवले होते कि अगोदर मी माझे शिक्षण पूर्ण करणार. कारण मला असे वाटते कि शिक्षण खूप महत्वाचे आहे.” ‘शाका लाका बूम बूम’ सीरिअल संपल्यानंतर जवळजवळ दहा वर्षे आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने ‘एक रिश्ता साझेदारी का’ ह्या सीरिअल मध्ये काम केले. ह्या सीरिअल मध्ये त्याने आर्यन दिवाकर सेठियाची भूमिका निभावली होती. किंशुक अनेकदा इव्हेंट्स आणि पार्टीज मध्ये दिसून येतो. किंशुक आता २८ वर्षाचा असून त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री शिव्या पठानिया सोबत असलेल्या रिलेशनशिप मुळे तो जास्त चर्चेत असतो.
करुणा :
सीरिअल मध्ये आपल्या गोड हास्याने सर्वांचे मन जिंकणारी एक क्युटशी छोटी मुलगी होती. त्या भूमिकेचे नाव होते करुणा. करुणाची भूमिका अभिनेत्री हंसिका मोटवानीने निभावली होती. हंसिका मोटवानीला तर सगळेच ओळखत असतील. तिने हिमेश रेशमियाच्या ‘आपक सुरूर’ ह्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. हंसिकाने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तेलगू चित्रपटांत सुद्धा काम केले आहे. तेलगू चित्रपटसृष्टीत हंसिकाने चांगले नाव कमावले आहे. तिने बालपणी ‘कोई मिल गया’ ह्या चित्रपटांत काम केले होते. त्याच बरोबर तिने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘देश मे निकला होगा चांद’ ह्यासारख्या अनेक सीरिअल्स मध्ये काम केलेले आहे. हंसिका मोटवानी आता सुद्धा चित्रपटांत काम करते. तिने कन्नड, तामिळ आणि तेलगू भाषेतील जवळजवळ ३० चित्रपटांमध्ये काम केले आहे.
टिटो :
सीरिअल मध्ये एका छोट्या पंजाबी मुलाचे कॉमेडी पात्र होते ते म्हणजे टिटोचे. टिटोला प्रत्येक परीक्षेत शून्य मार्क मिळायचे. आठवले ना, तो टिटो म्हणजेच मधुर मित्तल. आग्रा मध्ये जन्मलेल्या मधुरने बालकलाकार म्हणून शाहरुखच्या ‘वन टू का फोर’ आणि सलमानच्या ‘कहीं प्यार ना हो जाए’ ह्या चित्रपटात काम केले आहे. शो मध्ये विनोदी भूमिका साकारणारा मधुर खऱ्या आयुष्यात एक खूप चांगला डान्सर आहे. त्याने डान्स रियालिटी शोजमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे.परंतु मधुरला खरी ओळख मिळाली ती म्हणजे डॅनी बॉयल ह्यांच्या ऑस्कर विजेता चित्रपट ‘स्लमडॉग मिलेनिअर’ मुळे. मधुरने हॉलिवूडच्या दोन चित्रपटात काम केलेले आहे. ‘स्लमडॉग मिलेनिअर’ ह्या गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटात मधुरने सलीम नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याचबरोबर त्याने हॉलिवूडच्या ‘मिलियन डॉलर आर्म’ ह्या चित्रपटात काम केलेले आहे. हॉलिवूडमध्ये काम केलेल्या सलीमला बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे.
जग्गू :
सीरिअल मध्ये एका भित्र्या पोराची भूमिका होती, आठवली का. अहो तो नाही का, सीरिअलच्या टायटल सॉंग मध्ये एक ओळ असते ना ‘डरपोक है मिस्टर जग्गू’. आता आठवलं ना. जग्गूची भूमिका निभावली होती अदनान जेपी ह्याने. जग्गू शो मध्ये त्या मुलांच्या गॅंग मधील होता, ज्यात त्याची क्युटनेस इतर मुलांपेक्षा खूप वेगळी होती. त्याच्या भित्र्या आणि सरळ सध्या भूमिकेमुळे त्याची सुद्धा भूमिका मुलांना आवडत होती. ‘शाका लाका बूम बूम’ शिवाय अदनानने काही टीव्ही शोज मध्ये काम केलेले आहे. सध्या अदनान दुबईत राहत असून तो एका एडव्हर्टाईजींग कंपनीत काम करतो.
संजना :
सीरिअल मध्ये संजूच्या ग्रुप मध्ये एक सुंदर आणि स्टाईलिश मुलगी होती, त्या मुलीचे नाव होते संजना. संजनाची भूमिका रिमा वोहराने निभावली होती. रीमाचा जन्म मध्यप्रदेश मधील इंदौर मध्ये झाला असून तिने तिचे शिक्षण मुंबई मधून पूर्ण केले आहे. मोठ्या झाल्यानंतर तिने सीरिअल्समध्ये काम करणे सुरु ठेवले. रीमाने आपल्या करिअरमध्ये अनेक टीव्ही सीरिअल्स मध्ये काम केलेले आहे. तिने ‘ना आना इस देश लाडो’, ‘भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप’, ‘यम है हम’ ह्यासारख्या मोठ्या टीव्ही सीरिअलमध्ये काम केलेले आहे. सध्या ती साऊथच्या चित्रपटांत काम करते. इतर अभिनेत्रींनप्रमाणे तिला सोशिअल मीडियाची खूप आवड आहे. ती नेहमी इंस्टाग्रामवर आपले नवीन नवीन फोटोज अपलोड करत असते.
रितू :
शो मध्ये एक बॉय कट हेअर कट वाली अगदी मुलांच्या स्वभावाची एक मुलगी दाखवली होती. ती मुलगी नेहमी मुलांसोबत टक्कर घ्यायची. त्या मुलीचे नाव होते रितू. रितूची भूमिका निभावली होती सैनी राज हिने. सैनी आता अभिनय सोडून स्क्रिप्ट राईटिंग मध्ये आपले नशीब आजमावत आहे. सैनीने आतापर्यंत ‘ट्राफिक सिग्नल’ आणि ‘डरना जरुरी है’ सारख्या चित्रपटांची स्क्रिप्ट लिहिलेली आहे.
झुमरू :
संजू चा मित्र झुमरू तर तुम्हाला आठवत असेलच. संजूच्या पेन्सिलने काढलेल्या चित्रातून झुमरू तयार झाला होता. तो संजूला प्रत्येक संकटात मदत करताना दाखवण्यात आला होता. अनेकांना झुमरूचे कॅरॅक्टर खूप आवडले होते. झुमरूचे हे कॅरॅक्टर आदित्य कपाडिया ह्याने निभावले होते. मोठे झाल्यानंतर ‘एक दुसरे से करते है प्यार हम’, ‘अदालत’, ‘बडे अच्छे लगते है’ आणि ‘सूर्यपुत्र कर्ण’ ह्यासारख्या सीरिअल मध्ये त्याने काम केलेले आहे.