बॉलिवूडचा प्रत्येक स्टार एकापेक्षा एक आहे. बॉलिवूड हि भारताची एकमेव अशी इंडस्ट्री आहे जिथे आपले नशीब आजमावायला रोज कित्येक नवीन चेहरे येतात आणि त्यातले काही लोकप्रिय सुद्धा होतात. ह्यामध्ये काही असे पण स्टार्स आहेत जे चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत, परंतु अजूनही त्यांच्या अभिनयाची चर्चा बॉलिवूडमध्ये होत असते. अश्याच अभिनेत्यापैकी एक अभिनेता आहे, जो एके काळी बॉलिवूडचा खूप लोकप्रिय चेहरा होता. आम्ही चर्चा करत आहोत, धर्मेंद्रचे सुपुत्र सनी देओल ह्याच्या बद्दल. सनी देओलने आपल्या उत्तम अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सनी देओल इतका लोकप्रिय असूनही नेहमी तो आपले वैयक्तिक जीवन बॉलिवूडच्या झगमगती दुनियेपासून खूप दूर ठेवतो. सनी देओलने नेहमीच आपले वैयक्तिक जीवन मीडियापासून दूर ठेवत आला आहे. आज आम्ही तुम्हांला अशी गोष्ट सांगणार आहोत, जी गोष्ट अनेकांना माहिती नाही. खरंतर, सनी देओलने गुप्तरित्या परदेशात लग्न केले होते आणि त्याने इतके वर्ष आपल्या लग्नाला का सर्वांपासून लपवून ठेवले होते. तर आज आम्ही तुम्हांला ह्यामागचे कारण सुद्धा सांगणार आहोत.
सनीचा पहिला चित्रपट ‘बेताब’ होता. ह्या चित्रपटात त्याने अमृता सिंग सोबत काम केले होते. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली आणि हा चित्रपट हिट झाला होता. ‘बेताब’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच अमृता हँडसम आणि गुडलुकिंग सनीच्या दिशेने आकर्षित होऊ लागली होती. ऑनस्क्रीन तर दोघांची चांगली जोडी जमली होती, परंतु ऑफस्क्रीन सुद्धा दोघे भेटायला लागले होते. चित्रपटात एक चुंबनदृश्य सुद्धा होते. सोबत काही रोमँटिक दृश्य सुद्धा शूट केले होते. त्याकाळात बोल्ड दृश्य देणे खूप मोठी गोष्ट होती. जे सनी आणि अमृताने बोल्डनेस दृश्ये बिनधास्तपणे दिली होती. दोघांचा चित्रपटांतील रोमांस खऱ्या आयुष्यातील रोमान्स बनला होता. अमृता सनीला वेड्यासारखी प्रेम करत होती. तिला संपूर्ण जगासमोर आपल्या नात्याची कबुली द्यायची होती. परंतु ह्या गोष्टीसाठी सनी देओल तयार नव्हता. सनी देओलने सर्वांपासून आपले आणि अमृताचे नाते लपवून ठेवले होते. अमृताला वाटत होते कि सनी तिचा भावी जीवनसाठी बनण्यासाठी एकदम योग्य आहे.
सनीवर कुटुंबाची जबाबदारी होती, ह्यामुळे त्याने नेहमी आपले आणि अमृताचे नाते लपवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे अमृताची आई ह्या नात्याच्या विरुद्ध होती. तिची इच्छा होती कि, अमृताचे लग्न मोठ्या परिवारात व्हावे. सनीचे करिअर आता आताच सुरु झाले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आपल्या आईची इच्छा ध्यानी ठेवून अमृताने सनी देओलच्या कुटुंबाची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्याच्याबद्दल माहिती मिळवत असताना तिच्यासमोर जे सत्य आले, त्यामुळे ती पूर्णपणे तुटून गेली. तिला सनीच्या रिलेशनशिप बद्दल माहिती पडले. लंडनमध्ये पूजा नावाच्या मुलीसोबत सनीचे अफेअर होते. तर दुसरीकडे अमृता सनी सोबत जास्त असल्यामुळे त्याच्या घरचे वातावरण सुद्धा बिघडत चालले होते. त्याची आई प्रकाश कौर ह्यांना सुद्धा हे नातं मंजूर नव्हतं. त्यानंतर काही दिवसानंतर तर अमृताला हे सुद्धा माहिती पडले होते कि, सनीचे इंग्लंडमध्ये लग्न झालेले आहे. अमृता सनीच्या प्रेमात वेडी होती आणि तिला हे सत्य माहिती झाल्यावर विश्वासच बसत नव्हता. सनीने तिच्यापासून त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य लपवले होते. सत्य माहिती पडल्यानंतर अमृताला अंदाज आला कि सनी सारखं सारखं लंडन का जात असतो. सनी अमृताला सांगत असे कि तो बिजनेस संदर्भात लंडनला जात असतो.
जेव्हा सनी लंडनला जायचा तेव्हा अमृता एक केअरिंग गर्लफ्रेंडसारखी सनीच्या चित्रपटासाठी होणारी मिटिंग अटेंड करायची. एकाबाजूला अमृताच्या समोर सनीचे पूर्ण सत्य आले होते. तर दुसरीकडे पूजाला आपल्या पतीच्या अफेअरबद्दल कोणतीच माहिती नव्हती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सनी आणि पूजा दोन्ही कुटुंबात एक ऍग्रीमेंट झाले होते, जे सनी आणि पूजा ह्यांच्या लग्नासोबत फॅमिली रिलेशन मध्ये बदलले होते. सनीच्या कुटुंबाने त्याचे लग्न झाल्याची गोष्ट लपवून ठेवली होती. कारण आताच त्याच्या करिअरला सुरुवात झाली होती. सनीला भीती होती कि, लग्न झाल्याची बातमी माहिती झाल्यानंतर प्रेक्षक त्याला रोमँटिक हिरोसारखं पसंत करणार नाही. हेच कारण होते कि, पूजा लंडनमध्ये राहत होती आणि सनी प्रत्येक महिन्यात तिला भेटण्यासाठी लंडनमध्ये जात असे. ह्याच दरम्यान सनीचे लग्न झाल्याची बातमी वृत्तपत्रात छापून आली. परंतु सनी ह्या बातमीला नकार देत होता. परंतु त्यावेळी सनी आणि अमृताचे नाते पूर्णपणे संपले होते. हे नातं तर संपले, परंतु आता सनीच्या जीवनात खूप काही होणं बाकी होते. अमृताच्या नंतर सनीच्या आयुष्यात डिम्पल कपाडिया आली. दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा सगळीकडे पसरली होती. ह्या दोघांची प्रेमकहाणी ११ वर्षे चालली. त्याकाळी डिम्पल राजेश खन्ना ह्यांच्यापासून वेगळी राहत होती. सनी सुद्धा विवाहित होता. एका वृत्तपत्राने तर हे सुद्धा छापले होते कि डिम्पल आणि सनीने लग्न केले आहे. परंतु सनीच्या ह्या दुसऱ्या लग्नाचे कोणतेच पुरावा नव्हता. आणि सनी आणि डिम्पल ह्या दोघांनीही कधीही हि गोष्ट मान्य केली नाही.
आता जाणून घेऊया सनी देओल ह्याच्या पत्नीविषयी. सनी देओलचे लग्न पूजा देओल हिच्याशी झालेले आहे. पूजा नेहमीच लाइमलाईट पासून दूर असते. खूपच क्वचितच कोणी पूजाला मीडियासमोर पाहिले असेल. परंतु ती बॉलिवूडपासून दूरच राहत आली आहे. एकीकडे सनी देओल बॉलिवूडमध्ये काम करून नाव कमवत होता. तर दुसरीकडे लग्नाच्या काही वर्षानंतर घरी आल्यानंतर पूजा घरात राहून उत्तमप्रकारे संसार सांभाळत होती. तिने आपल्या कुटुंबासाठी पूर्ण वेळ दिला, ज्यामुळे मुलांनाही वडिलांची सोबत नसल्याची जास्त कमतरता भासली. इतकंच नाही, पूजा देओल रूपाने खूपच सुंदर आहे. दिसण्यात ती बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. पूजाला घरातील कामे करणे आणि पुस्तकं वाचण्याचा छंद आहे. ती रिकाम्यावेळी पुस्तकं वाचत असते. सूत्रांच्या माहितीनुसार, पूजा ऐश्वर्या रायची खूप मोठी फॅन आहे. हि गोष्ट तिने स्वतः एका मुलाखतीत म्हटली होती आणि ती ऐश्वर्यासारखी दिसण्याचा प्रयत्न करत असते. इतकंच नाही ‘यमला पगला दिवाना’ चित्रपटात तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. परंतु त्यावेळी अनेकांना ह्याबद्दल माहिती नव्हते. ह्या जोडप्यांना मुले असून करण देओल आणि राजवीर देओल. करण देओलने ह्याच वर्षी रिलीज झालेल्या ‘पल पल दिल के पास’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.