लग्न म्हणजे एक पवित्र नातं, ज्यात पती पत्नी एकमेकांसोबत आयुष्यभर साथ देण्याच्या शपथा घेतात. काही वैवाहिक जोडपे आयुष्यभर एकत्र राहतात. तर काही नाती काही काळापुरतीच असतात. काहींना एक लग्न आयुष्यभर सोबत ठेवतं तर काहींना अनेक लग्न करून सुद्धा खरा साथीदार मिळत नाही. बिहारमध्ये एका महिलेने पाच वेळा लग्न केले, त्यानंतर ह्या महिलेचे आपल्या एका पतीच्या भावासोबत प्रेम झाले. त्यानंतर ह्या महिलेने आपल्या पतीला सोडण्याच्या निर्णय घेतला. आणि आपल्या दिरासोबत ती पळून गेली. हे दोघेही दोन दिवस एका घरी राहत होते आणि महिलेने दिरासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. ह्या सर्व घटनेदरम्यान ह्या महिलेच्या सर्व पतीला ह्या गोष्टीची माहिती मिळाली आणि हे सर्व नवरे मिळून त्या महिलेला पकडण्यासाठी ती राहत असलेल्या घरी पोहोचले. ज्या ठिकाणी हि महिला आपल्या प्रियकरासोबत सोबत राहत होती, त्याच जागी सर्व पती मिळून तमाशा करायला सुरुवात केली आणि त्यांनी सर्व गावातल्या लोकांच्या मदतीने दोघांनाही घरातून बाहेर काढले. त्यानंतर दोघांची खूप धुलाई केली. इतकंच नाही तर ह्या दोघांची खूप वेळ धुलाई केल्यानंतर दोघांचेही मुंडन केले गेले आणि ह्या दोघांना सर्व गावभर फिरवले गेले. हि बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरू लागली तेव्हा ह्या घटनेला दाबण्याचा प्रयत्न केला गेला.
धडा शिकवण्यासाठी केलं सगळं
ह्या महिलेचे वय ३५ असल्याचे सांगितले जात आहे. हि महिला ह्या अगोदर पाच वेळा लग्न करून झालेली आहे. तर दुसरीकडे ती आपल्या प्रियकरासोबत लग्न करू इच्छित होती. परंतु जेव्हा खाटांगी, राजौन्ध आणि जमुगाय गावात राहणारे ह्या महिलेच्या पतींना हे सगळं माहिती झाले तेव्हा त्यांनी ह्या महिलेला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. महिलेकडून बदला घेण्यासाठी तिचे नवरे गावात हि गोष्ट पसरवू लागली कि ती आपल्या घरी आपल्या प्रियकरासोबत राहत आहे. त्यानंतर गावातील लोकांनी ह्या महिला आणि तिच्या प्रियकराला घरातून बाहेर काढत त्यांची धुलाई केली. महिला आणि तिच्या प्रियकराला अगोदर खूप शिव्या दिल्या आणि त्यानंतर दोघांची चप्पल बुटांनी धुलाई केली.
महिलेच्या नवर्यांनी तिला शिक्षा दिल्यानंतर एक आदेश जारी केले आणि महिला आणि तिच्या प्रियकराचे मुंडन केले गेले. त्यानंतर ह्या दोघांनाही पूर्ण गावभर फिरवण्यात आले. तर दुसरीकडे ह्या घटनेची सूचना पोलिसांनी मिळाली तेव्हा पंचायत बोलावण्यात आली आणि हि घटना सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. ह्या घटनेची तपासणी आता सिरदला ठाणेदार आशिष कुमार मिश्रा करत आहेत.
६ महिन्यांपासून होते प्रेम
असं बोललं जात आहे कि ज्या व्यक्ती सोबत हि महिला आपल्या घरात राहत होती ती व्यक्ती महिलेचा दीर आहे आणि जमुगाय गावातील नवऱ्याचा भाऊ आहे. ह्या दोघांमध्ये ६ महिन्यांपासून प्रेम होते. आणि त्यानंतर महिलेला तिच्या दिरासोबत लग्न करायचे होते. परंतु तिच्या नवऱ्यांना ह्या गोष्टीला विरोध होता. ज्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीचा हंगामा केला.